IMG 20260803 WA1003

भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन.!!!

57 / 100 SEO Score

भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी तसेच शेतजमिनींच्या मृदा पुनर्स्थापनेसाठी (Soil Restoration) विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी भडगाव तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

यापूर्वी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे कापूस, मका, सोयाबीन यांसारखी उभी पिके पूर्णपणे आडवी होऊन नष्ट झाल्याचे आढळून आले. तसेच पाण्याच्या प्रवाहाबरोबर शेतात टाकलेली महागडी रासायनिक खते आणि शेतजमिनीवरील सुपीक मातीचा थर वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व वाळू साचल्याने जमिनी तात्पुरत्या नापीक झाल्या असून, शेतबांध, ठिबक सिंचन संच, पाईपलाईन यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या

तलाठी, कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाकडून सर्व बाधित गावांतील शेतीपिके व शेतजमिनींचे तातडीने पंचनामे करावेत.

पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने इनपुट सबसिडी (Input Subsidy) मंजूर करावी.

मराठवाड्यातील पूरग्रस्त भागासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष सहाय्य पॅकेजच्या धर्तीवर भडगाव तालुक्यासाठीही विशेष मदत पॅकेजची शासनाकडे शिफारस करावी.

शेतात साचलेला गाळ व वाळू हटवून जमीन पूर्ववत सुपीक करण्यासाठी रब्बी हंगामापूर्वी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून द्यावा.

नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.

महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बाधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करावी.

या निवेदनाची प्रत जळगाव जिल्हाधिकारी तसेच भडगाव तालुका कृषी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशुतोष प्रदीपराव पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय बळीराम पाटील, युवक काँग्रेस विधानसभा पाचोरा-भडगाव अध्यक्ष मनोहर महाले, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस याकूब खान पठाण, युवक शहराध्यक्ष गोविंद देशमुख, युवक काँग्रेस सरचिटणीस अर्जुन प्रकाश शिंदे, तालुका उपाध्यक्ष विनोद नेरपगार, बेग कलीम बेग, तोफिक मणियार, विलास देशमुख यांच्यासह तालुका युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top