IMG 20260726 WA1212

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची निर्घृण हत्या; पती अटकेत

57 / 100 SEO Score

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची निर्घृण हत्या; पती अटकेत

भडगाव  प्रतिनिधी

भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे रविवारी सकाळी सुमारे 8.30 वाजता कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम पतीलाल राठोड (वय 40) याने पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय 36) हिच्या पोटावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या ललिता राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला. मयताचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 240/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करीत असून, सध्या परिसरात शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top