गोंडगाव विदयालयातील विदयार्थ्यांची पायी दिंडी.हरी नामाचा गजर.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयातील विदयार्थ्यांची गावातुन विणा, टाळ, मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात आली होती. हाती भगवे झेंडे मुखी हरी नाम असा भक्तीचा गजर दिसुन आला.विदयार्थ्यांनी सफेद कपडे, धोतर, टोपी, रुमाल तर विदयार्थीनींनी रंगीत साडया असा आकर्षक पोषाख परीधान केला होता. उत्साहात वारीचा कार्यक्रम पार पडला. आषाढी एकादशी निमित्त या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीने भक्तीमय वातावरण झाले होते. पांडुरंगाच्या भक्तीमय गितांनी परीसर दुमदुमल्याचे दिसुन आले.विदयार्थ्यांनी वारकरी पोषाख परीधान केल्याने खास आकर्षण ठरले.या पायी दिंडीचे पालक वर्ग व नागरीकांनी कौतुक केले.याकामी क्रीडाशिक्षक एस. डी. चौधरी, पी. व्ही. सोळंके यांनी विशेष परीश्रम घेतले.
यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक बी.जी.ननावरे,शिक्षक सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, पी. व्हि. सोळंके, बी. डी. बोरसे, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, ए. एम. साळुंखे, लिपीक पी. जे. देशमुख, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने सहभागी होत्या.





