शिक्षण वाचवा, राष्ट्र वाचवा. सोनम वांगचुकजी यांच्या आंदोलनाला व मागण्यांना जाहीर पाठिंबा.
चाळीसगाव प्रतिनिधी :-
देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित राहावे, यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. राष्ट्रहित आणि शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांसाठी सुरू असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, हीच आमची भूमिका आहे.
दरम्यान, आंदोलनादरम्यान शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अश्रूधुराचा वापर आणि लाठीचार्जचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीत नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी करणाऱ्या आणि आंदोलकांवर दडपशाही करणाऱ्या संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे, या प्रमुख मागणीचे निवेदन आज माननीय पंतप्रधान महोदयांना पाठविण्यात आले.
निवेदन मा .प्रांतसाहेब , मा.तहसिलदार साहेब चाळीसगाव यांना देतांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री प्रभाकर पारवे सर , तालुका अध्यक्ष श्री नितीन मोरे सर , तालुका अध्यक्ष श्री महेंद्रसिंग शिसोदे सर , श्री संजय साठे सर , तालुका अध्यक्ष श्री सचिन पाटील सर , कार्याध्यक्ष श्री सचिन अहिरराव सर , जिल्हा उपाध्यक्ष श्री गजानन मोरे सर , उपाध्यक्ष श्री प्रदिप वाघ सर , श्री श्रीकृष्ण अहिरे सर श्री दाभाडे सर , श्री विरेंद्र पाटील सर , श्री रविंद्र पाटील सर , श्री विजय कदम सर, श्री निलेश पाटील सर , श्री परदेशी सर श्री संजय वाघ सर उपस्थित होते.





