IMG 20260713 WA0858

वाढदिवसाचा समाजाभिमुख आदर्श; कु. लक्षिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोग्यांना मोफत रेनकोट वाटप.!!!

55 / 100 SEO Score

वाढदिवसाचा समाजाभिमुख आदर्श; कु. लक्षिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोग्यांना मोफत रेनकोट वाटप.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

वाढदिवस हा केवळ केक कापणे, शुभेच्छा स्वीकारणे किंवा आनंदोत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असावी, हा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम शिवसेना-युवासेना आणि स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात येत आहे. कु. लक्षिता लखीचंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या कर्मयोग्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोफत रेनकोट वाटप करण्यात येणार आहे.

हा उपक्रम  दि. १८ जुलै रोजी स्व. बापूजी युवा फाउंडेशन जनसंपर्क कार्यालय, कोठली रोड, भडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही नागरिकांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणाऱ्या भडगाव नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवक कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात मोफत रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे.

कु. लक्षिता या भडगाव नगर परिषदेचे गटनेते लखीचंद पाटील आणि नगरसेविका तथा महिला व बालविकास सभापती समीक्षा लखीचंद पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात असून, यंदाही त्याच परंपरेला उजाळा देण्यात आला आहे.

समाजाच्या आरोग्याची, स्वच्छतेची आणि सेवाभावाची जबाबदारी खांद्यावर घेऊन कार्य करणाऱ्या कर्मयोग्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविला जात असल्याने सेवाभावी कार्याची प्रेरणादायी सामाजिक परंपरा निर्माण होत आहे.

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. “जे समाजासाठी प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्या सेवेला सलाम आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमचे छोटेसे योगदान,” ही भावना या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

या समाजाभिमुख उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, सेवाभावी कार्यातून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रेरणा अशा उपक्रमांतून इतरांनाही मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top