SIR जनजागरण सभेद्वारे नागरिकांना जागरूकतेचे आवाहन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
जन जागरण मुस्लिम मंच, भडगाव यांच्या वतीने ‘SIR जनजागरण सभा – हम भारत के लोग’ या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना SIR संदर्भातील योग्य व अधिकृत माहिती मिळावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि जागरूक नागरिक म्हणून सहभाग वाढावा, या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात श्रद्धा रेखा राजेंद्र (SIR तज्ञ, पुणे) या मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, अब्दुल करीम सरताज (जळगाव), अध्यक्ष – स्वागरा एज्युकेशन सोसायटी हे विशेष उपस्थिती लाभणार आहेत.
ही सभा दि. १० जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ७.३० वाजता (नमाज-ए-मगरीब नंतर) आयशा हॉल, वाडी, मोहल्ला मक्का मशीद परिसर, भडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
आयोजकांनी भडगाव व परिसरातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून SIR संदर्भातील योग्य माहिती जाणून घेण्याचे व जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जन जागरण मुस्लिम मंच, भडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.





