वाडे गावच्या सुष्मिता बडजावत या लेकीने गाठले आभाळ . भारतीय वायु सेनेत निवड. सुभेदार मेजर जयसिंग बडजावत यांच्या कन्या कु. सुष्मिताचा गावात जंगी सत्कार.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील भुमिपुञ व सैन्यदलात सुभेदार मेजर जयसिंग लक्ष्मण बडजावत यांची कन्या कु. सुष्मिता बडजावत हिची भारतीय वायु सेनेत निवड झाल्याबद्दल वाडे ग्रामपंचायतीमध्ये भव्य सत्कार समारंभ पार पडला. सुष्मिता बडजावत ही भारतीय वायुसेनेत भरती झालेली पहिली कन्या आहे. यावेळी सजविलेल्या आकर्षक बग्गीतुन सुष्मिता बडजावत या कन्येची सवादय मिरवणुक काढण्यात आली. सुष्मिता हिचे उपस्थित मान्यवरांसह नागरीक, नातेवाईक मंडळी, आजी माजी सैनिकांनी सत्कार केला.
यावेळी सरपंच ललीता माळी, माजी सरपंच आधार माळी, ग्रा. पं. सदस्य रोशन परदेशी, प्रकाश परदेशी, प्रा. संजय राजपुत, विजय गोमलाडु, चाळीसगावचे माजी सैनिक आबासाहेब गरुड, सागर माने, बांबरुडचे प्रवीण राजपूत, सुभेदार मेजर जयसिंग बडजावत, रवी पाटील, माजी सैनिक एकनाथ सोनवणे, सुभाष परदेशी, शिवसिंग परदेशी, पोलीस पाटील अरविंद पाटील , अशोक परदेशी, प्रमोद वैष्णव, डॉ. योगेश गोसावी, लक्ष्मण पाटील व ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने हजर होते.
आबासाहेब गरुड, एकनाथ सोनवणे, कवी नामदेव माळी , जिभाऊ माळी व कु. सुष्मिता बडजावत यांच्या प्रभावी भाषणाने कार्यक्रमात जोश व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. “मी फक्त माझ्या आई-वडिलांचे व गावाचे स्वप्न पूर्ण केले. प्रत्येक मुलीने देशसेवेचे स्वप्न बघावे,” असे सुष्मिताने सांगितले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते सुष्मिताचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
“बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ”चा संदेश देत सुष्मिताने समाजातील मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.





