शिक्षण सभापती अतुल भाऊ परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त हाजी जमाल भाऊ कासार यांच्या हस्ते विशेष सत्कार
भडगाव प्रतिनिधी:-
भडगाव नगर परिषदेचे शिक्षण सभापती अतुल भाऊ परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ट्रॉफी, शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार सन ग्रीन पॉवर टेक चे संचालक हाजी जमाल भाऊ कासार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी हाजी जमाल भाऊ कासार यांनी अतुल भाऊ परदेशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्याचे कौतुक केले. भडगाव शहरातील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत, भविष्यातही त्यांनी याच समर्पित भावनेने जनसेवा सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी मा. नगरसेवक इसाहक मलिक,वाहजिद सर नाशिक उद्योजक आर आर पाटील, मंदार कासार जुबेर बेग आदी उपस्थित मान्यवरांनीही अतुल भाऊ परदेशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची दखल घेत पुढील सामाजिक व सार्वजनिक वाटचालीस यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
संपूर्ण सत्कार सोहळा आनंदी, उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांनी अतुल भाऊ परदेशी यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्याला अधिकाधिक यश मिळावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.





