IMG 20260611 WA0679

पाचोरा महसूल व पोलिस प्रशासनाची धडक कारवाई; रात्री 4 डंपर जप्त.!!!

59 / 100 SEO Score

पाचोरा महसूल व पोलिस प्रशासनाची धडक कारवाई; रात्री 4 डंपर जप्त.!!!

IMG 20260611 WA0678

पाचोरा, प्रतिनिधी :-

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पाचोरा महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत रात्रीच्या वेळी 4 डंपर पकडून जप्त केले. या कारवाईमुळे अवैध खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मा. तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने विविध भागात अचानक तपासणी मोहीम राबविली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. आवश्यक परवानग्या व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन आढळलेल्या 4 डंपरांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाईत महसूल विभागातील मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी राहुल पवार, ग्राम महसूल अधिकारी दीपक दवंगे, अतुल पाटील, रामकृष्ण बळी, तात्याराव सपकाळ, नकुल काळकर, राजेंद्र शिरसाठ, अविनाश जंजाळे, शिवाजी डोंगरे, अजमल मकानदार, तेजस भऱ्हाटे, अमोल शिंदे, गंगाधर सुरणार, लहू कोळेकर, कोतवाल प्रदीप भुरे, कोतवाल निलेश साळुंखे, वाहन चालक मनोज पाटील, विश्वेश यांनी सहभाग घेतला.

पोलिस विभागाकडून हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख बदुसिंग बंजारा आणि पीएसआय अशोक पाटील यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. महसूल आणि पोलिस विभागाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. भविष्यातही अवैध वाहतूक, उत्खनन आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले असून महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेमुळे अवैध खनिज माफियांना चाप बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top