अखेर भडगाव येथील साईनगर भागात नगर परीषदेमार्फत झाली स्वच्छता.नागरीकांनी मानले आभार.

53 / 100 SEO Score

अखेर भडगाव येथील साईनगर भागात नगर परीषदेमार्फत झाली स्वच्छता.नागरीकांनी मानले आभार.

भडगाव प्रतिनिधी :-

येथील साईनगर भागातील जागेत दि. १० रोजी नगर परीषद प्रशासनामार्फत दखल घेत काटेरी, झाडे झुडपे जेसीपी मशीनने तोडुन परीसर स्वच्छ करण्यात आला आहे. नागरीकांच्या तक्रारी दखल नगर परीषद प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे भडगाव येथील साईनगर भागातील रहिवाशी नागरीकांनी नगर परीषद प्रशासनाचे आभार मानलेले आहेत.यासाठी पञकार बांधवांचेही सहकार्य लाभलेले आहे. येथील साईनगर भागात पञकार अशोक महादु परदेशी यांचे घराच्या शेजारील जागेत काटेरी झाडे झुडपे वाढुन अस्वच्छ परीसर होता. या भागात घरांचे पाणी साचुन चिखलात डुकरांचा उपद्रव असायचा.

 

दुर्गंधीचा ञास सहन करावा लागत होता. त्यात डास, मच्छरांच्या उपद्रवामुळे रहिवाशी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या भागाची स्वच्छता करण्याबाबत पञकार अशोक परदेशी यांनी नगर परीषद प्रशासनाला लेखी निवेदनही दिलेले होते. तसेच नगर परीषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच या भागातील नगर सेवक अमोल पाटील व लखीचंद पाटील यांचेकडेही वेळोवेळी याबाबत तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. वृत्तपञांनीही साईनगर भागातील अस्वच्छतेबाबत समस्या मांडुन स्वच्छतेची मागणी मांडलेली होती. माञ नगर परीषद प्रशासनामार्फत टाळाटाळ करण्यात आली होती. यामुळे साईनगर भागातील रहिवाशांमध्ये नगर परीषद प्रशासनाच्या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

 

याबाबत अशोक परदेशी यांनी दि. ९ रोजी पुन्हा नगरसेवक अमोल पाटील व लखीचंद पाटील या दोघा पदाधिकार्यांना या साईनगर भागातील स्वच्छतेबाबत मागणी मांडली. नगर सेवक अमोल पाटील यांनी नगर परीषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याशी संपर्क साधुन या साईनगर भागातील समस्येबाबत माहीती दिली. अशोक परदेशी यांनीही मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचेशी समस्येबाबत मागणी मांडली. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दुसर्या दिवशी साईनगर भागातील काटेरी झाडे झुडपे तोडुन परीसर स्वच्छ करण्यात येईल. असे आश्वासन दिले होते. त्यानुसार दि. १० रोजी बुधवारी सकाळी नगर परीषदेमार्फत जेसीपी मशिनद्धारे परीसर स्वच्छ करण्यात आला आहे. यामुळे साईनगर भागातील रहिवाशी नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगर परीषद प्रशासनाचे व नगर सेवकांचे नागरीकांतुन आभार मानले जात आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!