Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कजगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कजगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कजगाव येथील ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित जीवनशैलीचा प्रसार तसेच भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात ब्रह्मकुमारी विद्यालय, केंद्राच्या संचालिका चंद्रकला दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच मनोज धाडीवाल, ग्रामपंचायत सदस्य अक्षय मालचे, दिनेश पाटील, अनिल महाजन, कजगाव पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, पत्रकार अमिन पिंजारी ,बंटी महाजन, बाबाजी पाटील, दत्तू महाजन, सर्पमित्र सागर भाऊ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




