गोंडगावच्या तुषार पाटील यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार
भडगाव प्रतिनिधी :-
गोंडगाव (ता. भडगाव) येथील गायक कलाकार तुषार सतीष पाटील यांना सामाजिक व कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बी.एस.एफ. बहुउद्देशीय संस्था, अमरावती, अपेक्षित नायक न्यूज तसेच संत कबीर बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. निलगिरी बाग परिसरातील धनलक्ष्मी गार्डन बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
‘सन्मानातून साकार होणार वृद्धाश्रम’ हा सोहळ्याचा मुख्य संकल्प होता. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते तुषार पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तुषार पाटील हे अनेक वर्षांपासून गायन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध लोकप्रिय गीते सादर केली आहेत. कला क्षेत्रासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले.
तुषार पाटील यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पत्रकार अशोकबापू परदेशी यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





