IMG 20260523 WA0958

गोंडगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल तब्बल ८३.०१ टक्के. विदयार्थ्यांचा गौरव.

गोंडगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल तब्बल ८३.०१ टक्के. विदयार्थ्यांचा गौरव.

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकुण निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. यात सायना पाटील हीने ८६.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेले प्रथम पाच विद्यार्थीनी कु. सायना जितेंद्र पाटील ८६.८० टक्के (प्रथम), कु.नंदिनी रविंद्र पाटील ८४.६० टक्के (द्वितीय), कु.नेहा अशोक पाटील ८३.४० टक्के (तृतीय), कु. योगिता दारासिंग परदेशी ८१.६० टक्के (चतुर्थ), चि. सौरव विजय पाटील ७८.८० टक्के (पाचवा) अशी आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल रा.स.शि.प्र. मंडळ लि. चाळीसगांव संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण आणि सचिव, प्राचार्य, बाळासाहेब चव्हाण,

संचालक मंडळ यांनी आनंद व्यक्त केला आहे. संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जी. ननावरे यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. या यशात शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी नमुद करण्यात आले.. यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशोशिखर गाठणार्या विदयार्थ्यांचा विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. ननावरे यांनी विदयालयामार्फत सत्कार केला. यावेळी पालक सभेचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, बांबरुड प्र. ब. चे पालक दारासिंग परदेशी, एस. वाय. पाटील, व्हि. ए. पाटील, एस. आर. महाजन, पी. जे. देशमुख, ए. एम. परदेशी आदि शिक्षक, शिक्षकेतर बंधु, पालक वर्ग उपस्थित होते.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top