भडगांव येथे भव्य-दिव्य “नमो गार्डन” भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रभाग क्रमांक ८ मध्ये साकार होणाऱ्या आधुनिक व आकर्षक “नमो गार्डन”चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून नागरिकांसाठी लवकरच हिरवागार व अत्याधुनिक उद्यान उपलब्ध होणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जिभू पाटील, पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते सुमितदादा पाटील, भडगाव नगरपरिषदेचे गटनेते लखीचंद भाऊ पाटील, बांधकाम सभापती नगमा बी. अलिम शहा तसेच प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका समीक्षाताई पाटील व नगरसेवक अमोलभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी “नमो गार्डन”मुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना विरंगुळ्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, हिरवळ व आकर्षक प्रकाशयोजना अशा विविध सुविधांनी हे उद्यान सुसज्ज करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेवक युवराज पाटील, विजयकुमार भोसले, संतोष पाटील, विशाल पाटील, इम्रानअली सैय्यद, डॉ. प्रमोद पाटील, सुधाकर पाटील, समाधान पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश भंडारी, आबा चौधरी, बबलु देवरे, जहागीर मालचे, महेंद्र ततार, निशांत सोमवंशी, सागर शेंडे, प्रितम भंडारी, गौतम मारवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
