IMG 20260504 WA0730 1

कजगाव बसस्थानक व स्टेशन रोडवर अतिक्रमणाचा विळखा; अपघातांचा धोका वाढला

67 / 100 SEO Score

कजगाव बसस्थानक व स्टेशन रोडवर अतिक्रमणाचा विळखा; अपघातांचा धोका वाढलाIMG 20260504 WA0730

अमीन पिंजारी भडगाव ता प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील कजगाव हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्यामुळे येथे दररोज नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, बसस्थानक परिसर व स्टेशन रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.IMG 20260504 WA0736

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही दुकानदारांनी दुकानांसमोर अनधिकृत अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहन पार्किंग होत असल्याने स्टेशन रोड मोठ्या प्रमाणात अरुंद झाला आहे. परिणामी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हा मार्ग बसस्थानक चौफुलीपासून जुने गाव, रेल्वे स्थानक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने येथे सतत वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत अतिक्रमण व अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत असून लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत.

काही अपघातांमध्ये नागरिकांना गंभीर दुखापती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वाढत्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देत अतिक्रमण हटविणे, बेशिस्त वाहनधारकांवर कठोर कारवाई करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मोठा अपघात होण्यापूर्वीच संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top