भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.!!!

62 / 100 SEO Score

भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.!!!भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.

भडगाव :-

भडगाव ते वाडे एस टी सायंकाळची मुक्कामे बस सह ३ बस फेर्या जवळपास १९ ते २० दिवसापासुन भडगाव बसस्थानकातुन अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. वाडे गावासह या ईतर गावांसाठी दिवसातुन दुपारी दिड वाजेची एकच बस सुरु आहे. ही मोठी शोकांतीका बनलेली आहे. यामुळे वृद्ध मंडळींसह प्रवाशी वर्गाचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. तरी भडगाव ते वाडे बंद सायंकाळची बसफेरीसह इतर २ बस फेर्याही तात्काळ सुरु करण्यात याव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने प्रवाशांसह भडगाव येथे आंदोलन छेडले जाईल अशा इशार्याचे निवेदन पाचोरा आगार प्रमुखांसह भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक यांना वाडे येथील नागरीक, पञकार श्री.अशोक बापु परदेशी यांनी दि. २ रोजी सायंकाळी भडगाव बसस्थानकात भेट घेऊन चर्चा करुन दिलेले आहे.

भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे कि, वाडे गावासह भडगाव ते वाडे दरम्यान सर्वच गावातील प्रवाशी, नागरीकांच्या मागणीनुसार व बस सेवेचा लाभ प्रवाशांना तात्काळ मिळावा म्हणुन विनंती अर्ज केल्याचे म्हटलेले आहे. भडगावहुन सकाळी ८.३०वाजता वाडे येथे सुटणारी बस, सायंकाळी ४.४५ वाजता सुटणारी बस, तसेच सायंकाळची वाडे येथे मुक्कामी सुटणारी बस अशा एकुण ३ बस फेर्या दि. १३/४/२०२६ म्हणजे १९ ते २० दिवसापासुन अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वृद्ध मंडळी, प्रवाशी वर्गाचे भडगावी तालुक्याच्या विविध कामांसाठी वा भडगावहुन वाडे मार्गाने जाणार्या प्रवाशांचे प्रवासासाठी मोठे हाल होतांना दिसत आहेत. प्रवाशांना खाजगी वाहनाने जादा आर्थिक भुर्दंड सहन करुन प्रवास करावा लागत आहे. तरी भडगाव ते वाडे बंद मुक्कामे बससह इतर बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.बस सेवेचा लाभ दयावा. अशी मागणी वाडे, टेकवाडे बुद्रुक, नावरे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव, दलवाडे, लोणपिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, वढधे, भडगाव आदि गावातील प्रवाशी वर्ग व नागरीकातुन होत आहे.

अन्यथा लोकशाही मार्गाने प्रवाशांसह भडगावी आंदोलन छेडले जाईल.सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांना देण्यात आलेले आहे. या निवेदनावर पञकार श्री.अशोक बापु परदेशी यांची सही आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top