लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न
भडगाव प्रतिनिधी :-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित,लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी मनस्वी अभिजीत शिसोदे हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला.इयत्ता चौथीतील विद्यार्थी निर्भय भास्कर तायडे याने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. अर्णव रावसाहेब भदाणे इयत्ता तिसरी याने तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. यशवर्धन तुषार देवरे इयत्ता दुसरीतून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना डिजिटल टॅब,बॅडमिंटनसंच व पुष्पगुच्छ देऊन नानासाहेबांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण
अ गटात सोहम योगेश गुरव प्रथम तर दक्षता जितेंद्र पाटील द्वितीय क्रमांक मिळवला.
ब गटात दिशा नितीन बच्छाव प्रथम तर पूर्वा कैलास वाघ द्वितीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना नानासाहेब तसेच मंचावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
नाविन्यपूर्ण स्पर्धा बक्षीस वितरण
लाडकुबाई शाळेत वर्षभर विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या अंतर्गत पाढे पाठांतर, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पाढे पाठांतर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी इयत्ता पहिली रितेश पाटील, हेमाक्षी पाटील इयत्ता दुसरी रुही सैंदाणे इयत्ता तिसरी सानवी शिंदे, सिद्धी चौधरी इयत्ता चौथी यज्ञेश पाटील व दिशा बच्छाव यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या वतीने रोख दोनशे रुपये प्रत्येकी देण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी बक्षिसाची घोषणा केली होती.बाल वर्गातील नवनियुक्त शिक्षिका अकसा आसीम खान यांचा सत्कार नानासाहेबांच्या वतीने करण्यात आला.तसेच शाळेतील आदर्श विद्यार्थिनी हिरण्या निरंजन पाटील हिचा वाढदिवस शुभेच्छा पत्र,पुष्पगुच्छ देऊन नानासाहेबांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी श्री अभिजीत सिसोदे, आर.डी महाजन,रावसाहेब भदाणे, भास्कर तायडे इत्यादी पालक उपस्थित होते. त्यांनी मनोगतात लाडकुबाई शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे तर फलक लेखन श्री अनंत हिरे यांनी केले. व्हिडिओ निर्मिती श्री सुयोग पाटील यांनी केली.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक बंधु भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
![]()




