Skip to content

शिवसेना-युवासेना भडगावतर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!

शिवसेना-युवासेना भडगावतर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

रमजान ईदच्या पवित्र पर्वानिमित्त भडगाव शहरात शिवसेना-युवासेनेतर्फे ईद मिलन व शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाला हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या वेळी मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी, नगराध्यक्षा पती जाहगीर मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, (हेट्रिक)नगरसेवक असीम भाऊ मिर्झा,इम्रान अली सय्यद,डॉ. विजयकुमार देशमुख, शशिकांत येवले,अतुल परदेशी, अतुल पाटील,संतोष महाजन,डॉ.प्रमोद पाटील, विजयकुमार भोसले, हाजी खलील शेख (मिस्त्री)जितू आचारी, युवराज आबा,देवा अहिरे,अलीम शाह,शहरप्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे, नाजीम सर, सय्यद मोहब्बत अली, हाजी जाकीर कुरेशी,हाजी अल्ताफ खाटीक,नईम भाई, शेख इमरानुलहक, बशारत अली, अफजल खान, गुड्डू मिस्त्री, नजीर मुजावर, अल्ताफ शेख,राजू अहिरे महेंद्र ततार वकार शेख,युनूस खान अजीज पेंटर,पत्रकार जावेद शेख, हय्युम अली,तसेच राही फाउंडेशन चे अध्यक्ष दानिश आलम, उपाध्यक्ष तथा पत्रकार अबरार मिर्झा, मुजम्मील शेख, हाजी जमाल कासार, जुबेर बेग, आदींसह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. “समाजात परस्परांबद्दल प्रेम व विश्वास टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे. धर्माच्या नावावर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी लोक करत असले, तरी आपण सर्वांनी एकत्र राहून तो हाणून पाडला पाहिजे,” असे ते म्हणाले.

रमजान महिन्याचे महत्त्व सांगताना त्यांनी उपवासाचे वैज्ञानिक व आध्यात्मिक फायदे अधोरेखित केले. “जसा मोबाईल किंवा वाहनाला सर्विसिंगची गरज असते, तसाच आपल्या शरीरालाही विश्रांती व शिस्त आवश्यक असते. रोजा म्हणजे आत्मशुद्धी आणि संयमाचे प्रतीक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी लहान वयात रोजा पाळणाऱ्या चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक करत आमदारांनी सांगितले की, “लहान वयातच चांगल्या संस्कारांची पायाभरणी होत असते, ही अभिमानाची बाब आहे.”

तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा उल्लेख करत समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या मदतीची उदाहरणे दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा संदर्भ देत सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण त्यांनी दिली.

शेवटी, “लहानसहान वादांना धर्माचे रूप न देता आपसातच मिटवावे. शांतता आणि बंधुभाव टिकवणे हीच खरी प्रगतीची दिशा आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!