गुरुपौर्णीमेनिमित्त आज आपल्या गृपवर प्रेरणादाई अन शुभेच्छा देणारे ठरले असेही अनमोल रत्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
आज गुरुपौर्णिमेनिमित्त विविध शाळांमध्ये कार्यक्रम अतीशय आनंदात राबविण्यात आले. त्यासोबतच शाळांमध्ये सुंदर फलक लेखनही करण्यात आले. आपल्या चाळीसगाव
रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत कळमडु माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात शिक्षक श्री. घनशाम बोरसे सरांनी अतिशय सुंदर फलक लेखन करुन गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
तसेच देवळी माध्यमिक विदयालयातही शिक्षक श्री. जी.टी.जाधव
सरांनीही अतिशय सुंदर फलक लेखन करुन गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. या दोघाही विदयालयाच्या उत्कृष्ट फलक लेखन सार्यांचे आकर्षण ठरुन आज गुरुपौर्णीमेनीमित्त शुभेच्छा दिल्या.
तसेच वाघळी विदयालयाचे सेवक श्री. आदरणीय रविंद्रभाऊ संभाजी वाघ यांनी वाघळीच्या श्री. विठ्ठल मंदीराच्या मंदीरात राहुन अनेक वर्ष खरी सेवा केलेली आहे. ऐवढेच नव्हे तर श्री. रविभाऊ वाघ यांनी श्री. संत जनार्दन स्वामी यांच्या वेरुळ येथील देवस्थानात शिक्षण अन अध्रात्मिकतेचे धडे गिरवत शिक्षण घेतलेले आहे. ते श्री. जनार्दन स्वामींचे सुरुवातीपासुन भक्त आहेत. आजही ते या देवतांची मनोभावे पुजा अर्चा करुन शाळेची आपली डयुटी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
भक्तीभावाची अन शिकवणीची अन सेवा करण्याची संधी त्यांनी मिळवुन दिली. म्हणुन गुरु पौर्ण्णीमेनिमित्त हा आठवणीचा क्षण आमच्या वाघळी विदयालयातील दैशभक्ती अन भक्तीमय वातावरणातुन आज गुरुपौर्णीमेनिमित्त
उजाळा मिळाला आहे. अशी माहिती गोंडगाव विदयालयाचे कर्मचारी अन पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी दिली आहे.





