IMG 20260615 WA0979

गो.पु.पाटील विद्यालय,कोळगाव येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.!!!

59 / 100 SEO Score

गो.पु.पाटील विद्यालय,कोळगाव येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव कोळगाव कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, गो.पु.पाटील विद्यालय,कोळगाव येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रास्ताविकातून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.आर. वळखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व पाठ्यपुस्तकाचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका ताईसो डॉ.पुनम प्रशांतराव पाटील स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री.युवराज सोनू पाटील,श्री.संभाजी अरविंद पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री.आर.आर.वळखंडे सर, पर्यवेक्षक श्री.बी.डी.साळुंखे सर, यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प,मोफत पाठ्यपुस्तक देऊन स्वागत केले तद्नंतर विद्यालयातील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले तर शिक्षकांनी फुलांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले.

महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती एम.बी.मराठे मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने नानासाहेब प्रतापराव हरी पाटील व डॉ.पूनमताई प्रशांतराव पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि शिवराज्यभिषेकाची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला, प्रा.मनोज पवार यांनी मराठे मॅडम यांना त्यांच्या फोटोंचा अल्बम सप्रेम भेट म्हणून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री.एस.ए.वाघ सर यांनी केले.प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होणे साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top