कजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Spread the love
63 / 100 SEO Score

कजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीकजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी,

कजगाव (ता. भडगाव) येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकाळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमांना रंगत आणली. गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संध्याकाळी सर्व समाज बांधवांच्या सहभागातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण गावात जल्लोषाचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे साहेब, पीएसआय करकार मॅडम, पोलीस हवालदार किशोर सोनवणे, निलेश ब्रह्मानकार, सुनील राजपूत तसेच होमगार्ड कर्मचारी यांनी उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top