IMG 20260815 WA06541

जि. प. उर्दू बॉईज स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.!!!

59 / 100 SEO Score

जि. प. उर्दू बॉईज स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव येथील जि. प. उर्दू बॉईज स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेच्या प्रांगणात प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सय्यद इमरान अली सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,महाराष्ट्रगीत देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी तंबाखूमुक्त महाराष्ट्र करण्याची शपथ तसेच साक्षरतेची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रमास नगरसेवक सय्यद इमरान अली, माजी डेप्युटी सरपंच हाजी ऐतबार खान, माजी नगरसेवक भिकूनूर खान, हाजी जाकीर कुरेशी, एजाज खान, जुनेद खान मुंबई पोलिस रिजवान खान,SMC अध्यक्ष नजीर मुजावर, पत्रकार जावेद शेख, पत्रकार अबरार मिर्झा यांच्यासह इतर मान्यवर,शिक्षक,केंद्र प्रमुख शारीख सर, मुख्याध्यापक बेग जाहिद,सिद्दीकी लुकमान,नसीरुद्दीन शेख,बागवान नासिर,पटेल शिरीन,वर्षा पाटील,अमीरहमजा सय्यद,तबस्सुम बेगम शिक्षकेतर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन मिर्झा तस्लिम सर यांनी केले

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार, सुशिक्षित व कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top