IMG 20260813 WA1680

वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण; सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांची सुरेल मानवंदना

57 / 100 SEO Score

वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण; सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांची सुरेल मानवंदना

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मातृभूमीवरील प्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्तीची भावना जागविणारे ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत भारतीयांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या सहभागातून विशेष संगीतनिर्मिती करण्यात आली आहे. हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप आणि उदय साळवी यांनी संगीत संयोजन केले असून उदय साळवी यांनी संगीत प्रोग्रामिंग केले आहे.

सत्यजित जामसांडेकर यांनी रिदम अरेंजमेंट आणि प्रोग्रामिंग केले आहे. लाइव्ह रिदममध्ये सत्यजित जामसांडेकर, प्रसाद मयेकर, तेजस सातार्डेकर आणि मयूर मगरे यांचा सहभाग आहे. सितारवादन रवि चारी यांनी केले असून बासरीवादन विजय तांबे यांनी केले आहे. ‘स्टुडिओ एएमव्ही’ येथे हर्ष भोईर यांनी ध्वनिमुद्रण केले आहे.

या निर्मितीचे मिक्स आणि मास्टरिंग तुषार पंडित यांनी केले आहे. व्हिडिओचे श्रेय विश्वास राख यांना देण्यात आले आहे. व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्सची जबाबदारी शशांक एस. कोंडविलकर यांनी सांभाळली आहे. स्वरांमध्ये रुपाली पाटील, पूनम पगारे, प्राजक्ता माहुलकर, महेक शेख, गौरी डोंगरे, नंदेश उमप, प्रसाद विभुते, अभिषेक गाडेकर, दिनेश नाडकर आणि अतुल पोडवाल यांचा सहभाग आहे.

या विशेष निर्मितीच्या निर्मात्या सरिता नंदेश उमप आहेत. संगीत, गायन, वाद्यसंगीत, रिदम आणि दृक्-श्राव्य निर्मिती अशा विविध अंगांचा यात समन्वय साधण्यात आला आहे. विविध कलाकार आणि तंत्रज्ञांनी आपापल्या क्षेत्रातून या निर्मितीत योगदान दिले आहे.

गायनासोबत सितार, बासरी आणि लाइव्ह रिदमचा वापर करण्यात आला आहे. संगीत संयोजन, प्रोग्रामिंग, ध्वनिमुद्रण, मिक्स-मास्टरिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स अशा विविध तांत्रिक अंगांचीही या निर्मितीत सांगड घालण्यात आली आहे. ही विशेष संगीतनिर्मिती १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top