IMG 20260730 WA1666

धुळे येथे भीमस्मृती दिनानिमित्त वाहतूक मार्गात बदल; अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

55 / 100 SEO Score

धुळे येथे भीमस्मृती दिनानिमित्त वाहतूक मार्गात बदल; अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

धुळे  प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात 31 जुलै रोजी भीमस्मृती दिनानिमित्त लळिंग (ता. जि. धुळे) येथे होणाऱ्या मेळावा व उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक व अनुयायी येणार असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. विशेषतः धुळे ते मालेगाव मार्गावरील अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमस्मृती दिनानिमित्त लळिंग येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक, रक्तदान शिबिर तसेच जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांतून हजारो अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यामुळे धुळे ते मालेगावकडे जाणाऱ्या व येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक चाळीसगाव चौफुली – गरताड – शिरुड चौफुली – हेंदूण – मोघण – आव्ही मार्गे मालेगावकडे वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्सवादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, विविध ठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व राज्य मार्ग क्रमांक 211 वर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच महसूल विभाग, धुळे महानगरपालिका, आरोग्य विभाग, वन विभाग यांच्या समन्वयातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, क्रेन, एसडीआरएफ पथक आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिक व भाविकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top