Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

वाडे विकासोच्या चेअरमन पदि डाॅ. दिवाकर पाटील यांची बिनविरोध निवड.
वाडे विकासोच्या चेअरमन पदि डाॅ. दिवाकर पाटील यांची बिनविरोध निवड.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि डाॅ. दिवाकर वेडु पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचा कार्यक्रम दि. १३ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आली. ही निवडीची सभा अविनाश पाटील अध्यासी अधिकारी तथा सहकार अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी संचालक मंडळ व नागरीकांनी नवनिर्वाचीत चेअरमन डाॅ. दिवाकर पाटील, अशोक भुतेसिंग परदेशी, अविनाश पाटील, प्रेमसिंग पाटील, पञकार अशोक परदेशी यांचा सत्कार पुष्पहार, शाल देऊन सत्कार केला. तसेच यावेळी पञकार अशोक परदेशी यांनीही नवनिर्वाचीत चेअरमन डाॅ. दिवाकर पाटील यांचा सत्कार केला.
अशोक भुतेसिंग परदेशी यांनी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली.यावेळी संचालक चंद्रशेखर चौधरी यांनी सुञसंचलन केले.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन सुपडु गंगाराम मोरे, संचालक देविदास सहादु माळी, अशोक भुतेसिंग परदेशी, उदयसिंग बाबुसिंग परदेशी, चंद्रशेखर विष्णु चौधरी, विजय रामलाल परदेशी, भाऊसाहेब नामदेव पाटील, कैलास अभिमन माळी,
साहेबराव कौतीक माळी, केशरबाई लक्ष्मण माळी, सुंदरबाई रामदास माळी, संगीताबाई शांताराम माळी आदि संचालक तसेच माजी सरपंच आधार माळी, नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पाटील, व्हाईस चेअरमन शामराव माळी, माजी चेअरमन नारायण परदेशी, पंढरीनाथ चौधरी, इंदलसिंग परदेशी, बाळु पाटील, अरुण माळी, जालींदर चित्ते,आधार माळी,
फौजी एकनाथ माळी, वामन माळी, कवि नामदेव माळी, अशोक परदेशी, शामराव पाटील, नथ्थुसिंग परदेशी, विकी पाटील,विजय गोमलाडु, किशोर महाजन, बंटी पाटील, दुर्गेश चौधरी,विठ्ठल परदेशी, शशिकांत महाजन, दुध उत्पादक सोसायटीचे संचालक सतीष महाजन, शरद चौधरी, सागर पाटील, नारायण महाजन, लिपीक दिलीप पाटील, दुलीचंद परदेशी, ज्ञानेश्वर माळी आदि नागरीक व संचालक उपस्थित होते. त्यांना सचीव अर्जुन पाटील, प्रेमसिंग पाटील यांनी याकामी सहकार्य केले.



