वाडे येथील ३ तरुण अग्निवीरमध्ये भर्ती. अशोक परदेशी यांनी केला तिघांचा सत्कार.!!!

53 / 100 SEO Score

वाडे येथील ३ तरुण अग्निवीरमध्ये भर्ती. अशोक परदेशी यांनी केला तिघांचा सत्कार.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाडे येथील सोनु शाम महाजन,हर्षल ज्ञानेश्वर महाजन, ऋषिराज प्रविण पाटील हे तिघे तरुण नुकतेच अग्निवीर सैन्यदलात भर्ती झालेले आहेत. या तिघा तरुणांचा पञकार अशोक परदेशी, लक्ष्मण पाटील, प्रमोद वैष्णव, योगेश गोसावी यांचेसह पञकार संघाच्या पदाधिकार्यांमार्फत सत्कार करण्यात आला. व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिक्षक काशिनाथ महाजन यांनी मनोगत व्यक्त करुन माऊली अभ्यासीकेची विदयार्थ्यांना अभ्यासाठी अन उज्वल भविष्यासाठी चांगली सुविधा मिळालेली आहे असे सांगीतले व या तरुणांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अतुल सोनवणे, धम्मपाल जाधव, समाधान सोनवणे, शिक्षक काशिनाथ महाजन, नितीन सोनवणे आदि तरुणांची उपस्थिती होती.

या तिघा तरुणांचा विविध संघटना व मिञ परीवार, ग्रामस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच मिञ परीवारामार्फत या तिघा तरुणांची गावातुन डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणुकही काढण्यात आली होती.या मिरवणुकीत तरुण, मिञ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

हे तिघ तरुण वाडे येथील माऊली अभ्यासीका वर्गात दररोज स्पर्धापरीक्षा पुस्तकांसह इतर पुस्तकांचा अभ्यास करायचे. तिघांनी मोठया मेहनतीने व जिद्द मनात ठेऊन यश मिळविलेले आहे. ही माऊली अभ्यासीका पञकार अशोक परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेली आहे. भडगाव येथील माऊली फाऊंडेशन मार्फत ही माऊली अभ्यासीका सुविधा मिळालेली आहे. या तिघा तरुणांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. यापुर्वीही या माऊली अभ्यासीकामध्ये अभ्यास करणारे सोमेश्वर राजपुत, रोहीत धनसिंग परदेशी, शामकांत बारकु सोनवणे हे तिन्ही तरुणही सैन्यदलात भर्ती झालेले आहेत. या तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी मिळालेली आहे. माऊली अभ्यासीका विदयार्थी, तरुणांसाठी मोलाची ठरत आहे. या अभ्यासीकेत दररोज अनेक तरुण अभ्यास करीत आहे. याकामी भडगाव येथील माऊली फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!