IMG 20260603 WA1327

भडगाव क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प विविध उपक्रमांनी गाजला.!!!

भडगाव क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प विविध उपक्रमांनी गाजला.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला क्रिकेट समर कॅम्प विविध क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी यशस्वीरीत्या संपन्न झाला. १ मे ते २ जून या कालावधीत झालेल्या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे धडेही देण्यात आले.

कॅम्पमध्ये फिटनेस प्रशिक्षण, क्रिकेट सराव, सामने, योगा, प्राणायाम आणि मड थेरपीचे आयोजन करण्यात आले. इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. तसेच जनगणना जनजागृतीसाठी पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी संगीत, सामान्य ज्ञान, फिटनेस व व्यसनमुक्ती या विषयांवरील विशेष सत्रे घेण्यात आली. पोलीस कर्मचारी हरीश परदेशी व उमेश भोई यांनी मार्गदर्शन केले. प्रशांत सोळंके व नीरज खैरनार यांनी संगीत क्षेत्रातील कलागुणांना प्रोत्साहन देणारी सत्रे घेतली.

१ जून रोजी खेळाडूंसाठी डीएम वॉटरपार्क येथे सहलीचे आयोजन करण्यात आले. कॅम्पमुळे विद्यार्थ्यांच्या क्रिकेट कौशल्यासोबतच शिस्त, सामाजिक जाणीव, आरोग्यविषयक जागरूकता आणि आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसून आले.

समारोप कार्यक्रमास पाचोरा शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्यासह विविध मान्यवर, पालक आणि माजी खेळाडू उपस्थित होते. प्रा. डॉ. दिनेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अकॅडमीचे संचालक रवींद्र वाडेकर यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी झाला.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top