महाराष्ट्र डायरी

परदेशी, राजपुत समाजातील पाचोरा येथे वधु वर परीचय संमेलन.

पाचोरा प्रतिनिधी:-

परदेशी राजपुत समाजातील वधु वर परीचय संमेलनाचे आयोजन पाचोरा जि. जळगाव येथे दि. १ रोजी रविवारी सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे. हे संमेलन पाचोरा येथील सोनाई हाॅल, नाथ मंदिर जारगाव येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. तरी ज्या पालकांचे मुले, मुली अविवाहीत असतील. अथवा विवाहयोग्य असतील त्यांनी या वधु वर परीचय संमेलनाचा लाभ घ्यावा. व कुटुंबासह या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक परदेशी राजपुत समाज संघटना जळगाव जिल्हा तसेच जळगाव जिल्हा तंटामुक्ती समिती मार्फत करण्यात आलेले आहे. समाजाचे वधु वर परीचय संमेलनाचे दुसरे वर्ष आहे. समाजाच्या तालुका बैठका घेऊन या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सुरु आहे. समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव परीश्रम घेत आहेत.

Exit mobile version